क्रेटा कार आणि ट्रॅक्टर चा भीषण अपघात

एक जण जागीच ठार तर एक जण जखमी

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) : कामानिमित्त नागपूर ला जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन गावाजवळ कार आणि ट्रॅक्टर मध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाल्याची घटना सकाळी 8 वाजता दरम्यान घडली, आनंद गण्यारपवार हे या अपघातात जागीच ठार झाले तर अतुल गण्यारपवार  जखमी झाले, जखमीना ब्रह्मपुरी येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले.

गडचिरोली जिल्यातील चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार आणि त्याचे चुलतभाऊ आनंद गण्यारपवार हे क्रेटा क्र. एम एच 34 व्ही 245 या चारचाकी ब्रह्मपुरी मार्गे नागपूरला कामानिमित्त जात असताना ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथे त्यांच्या कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला, या अपघातात अतुल गण्यारपवार जखमी झाले आहेत, तर त्यांचे चुलत भाऊ आनंद गण्यारपवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, अतुल गण्यारपवार यांना ब्रह्मपुरीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे,

सदर अपघात एवढा भीषण होती की ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले आहेत. दरम्यान पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त नागरिकांना दवाखान्यात दाखल केलं आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.