‘‘ती’’ तक्रार गैरसमजुतीने, डोणीच्या आशिष नैतामने सादर केले शपथपत्र

वनविभागाच्या  अधिकाऱ्यांवर कारवाई करू नये : शपथपत्रात उल्लेख

मूल (प्रतिनिधी) : फुलझरीच्या जंगलात 30 डिसेंबर राजी भारत कोवे याचेवर वाघाने हल्ला करून ठार केले, सदर घटनेचा तपास करण्यासाठी 1 जानेवारी रोजी रात्रौच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी  आशिष नैताम आणि मनोज मरापे यांना जानाळा येथिल वनविभागाच्या कार्यालयात घेवून गेले, आणि बयान घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणुन सोडले, या घटनेवरून डोणीच्या आशिष नैताम यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये येऊन मारहाण केल्याची तक्रार दाखल केली, परंतु ती तक्रार मी गैरसमजुतीने केल्याचे आशिष नैताम यांनी सांगीतले.

डोणी येथील भारत रामदास कोवे, आशिष चंद्रभान नैताम आणि रूपेश नैताम यांनी चिरोली येथील भात गिरणीमध्ये धान पिसाईसाठी 30 डिसेंबर रोजी दुचाकी वाहनाने गेले होते. सायंकाळच्या सुमारास धान पिसाई झाल्यानंतर तांदुळ ट्रॅक्टरनी मूल-डोणी मार्गाने पाठविले, दरम्यान भारत कोवे, आशिष नैताम आणि रूपेश नैताम हे दुचाकीने फुलझरी मार्गे डोणी येथे जाण्यासाठी निघाले, फुलझरी येथे नातेवाहीक असलेल्या मनोज मरापे याच्या घरी गेले, काही वेळ थांबुन परत डोणी येथे जात असताना मध्येच दुचाकी वाहन बंद पडली, दुचाकी घेवुन जात असतांना मित्रांमध्ये शाब्दीक वाद झाला, यावेळी भारत कोवे हा रागाच्या भरात जंगलात पळुन गेला, त्याची शोधाशोध केली मात्र तो मिळाला नाही, दुसऱ्या दिवशी जंगलात जावुन शोध घेतला असता, त्याला वाघाने ठार केल्याची दिसुन आले-

सदर घटनेसंबधाने माहिती घेण्यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आशिष नैताम आणि मनोज मरापे यांना जानाळा येथील वनविभागाच्या कार्यालयात नेवुन बयाण नोंदविले, वाघाची दहशत असल्याने रात्रौ घरी न सोडता सकाळी पोहचवुन दिले, वनविभाग कारवाई करेल यागैरसमजुतीने 3 जानेवारी रोजी वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नायगमकर, वनरक्षक नागोबा ठाकरे, क्षेत्र सहा. विनोद धुर्वे, वनरक्षक निलेश बोरकर यांनी मारहाण केल्याची मूल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. सदर तक्रार माझे गैरसमजुतीने करण्यात आल्याचे तक्रारकर्ते आशिष नैताम यांनी सांगीतले.

केलेल्या तक्रारीवरून कोणावरही कारवाही करु नये यासाठी आशिष नैताम यांनी मूल तहसिल कार्यालयातून शपथपत्र तयार केले असुन त्यानी मूल पोलीस स्टेशनला 24 जानेवारी रोजी दिल्याचे सांगीतले.