निराधार योजनेचे 138 प्रकरणाला मंजूरी : राकेश रत्नावार

लाभार्थ्यांना दिलासा

मूल (प्रतिनिधी) :  निराधार व्यक्तीना जिवन जगण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जातो, सदर योजनेच्या समितीची शुक्रवारी तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली, सदर सभेत विविध योजनेच्या 138 प्रकरणाला मंजुरी देण्यात आली, यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

संजय गांधी निराधार योजनेची बैठक दर महिण्याला घेण्यात येते, शुक्रवारी मूल येथील बैठकीत श्रावणबाळ योजना 79, वृध्दपकाळ योजना 39, संजय गांधी निराधार योजना 10, इंदिरा गांधी विधवा योजना 9 आणि इंदिरा गांधी अपंग 1 प्रकरणाला मंजूरी देण्यात आली.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेचे अर्ज प्रलंबित राहणार नाही याद्ष्टीने समिती दर महिण्यात सभा घेवुन योजनेच्या अर्जावर चर्चा करून मंजुरी देत आहे, अपुऱ्या कागदपत्रामुळे प्रलंबित राहलेल्या अर्जदारानी कागदपत्राची पूर्तता करावी, पुढील महिण्यात अर्जावर चर्चा करून अर्ज मार्गी काढण्यात येईल., सदर योजने संबंधाने अडचणी असल्यास नागरीकांनी तहसिल कार्यालयातील संबधीत कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा असे आवाहन समितीकडुन करण्यात आले.

सभेला संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार,, नायब तहसीलदार ठाकरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य .नितीन येरोजवार, .दशरथ वाकुडकर, सोनल मडावी, सत्यनारायण अमदुर्तीवार, रूपाली संतोषवार, अर्चना चावरे, व संजय गांधी निराधार योजनेचे कर्मचारी गिरडकर उपस्थित होते.

लाभार्थ्यांनी गैरसमज करू नये : राकेश रत्नावार 
शासनाकडून अनुदान मिळण्यांस विलंब होत असल्यामूळे निधी उपलब्धतेसाठी समिती पाठपुरावा करीत असून अनुदान प्राप्त होताच तात्काळ लाभार्थ्यांचे खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यांत येईल लाभार्थ्यांनी गैरसमज करू नये असे आवाहान समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केले