“त्या” शिक्षकावर निलंबनाची कारवाई करा : पृथ्वीराज अवताडे

नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकाचे  निलंबन झाल्याशिवाय गप्प बसणार नाही

मंगेश पोटवार, मूल
गेल्या अनेक वर्षापासुन शिक्षकीपेशात राहुन नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायात ‘आकाशभरारी” घेणाऱ्या ‘त्या’ शिक्षकाचे निलंबन करण्यात यावे, शिक्षकीपेशाला कलंक असलेल्या त्याशिक्षकाचे जोपर्यंत निलंबन होणार नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समितीचे सदस्य पृथ्वीराज अवताडे यांनी जिल्हा परिषदेच्या वतिने आयोजीत शिक्षण समितीच्या सभेत दिला आहे.

ऑस्टेलियाच्या एका कंपनीमार्फत नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायात “आकाशभरारी’ घेणाऱ्या त्या शिक्षकासह काही शिक्षकासंबधाने दे धक्का एक्सप्रेस मध्ये वृत्त प्रकाशित केले होते, त्यावृत्ताची दखल घेत राज्याचे शिक्षण राज्यमंत्री नामदार बच्चु कडु यांनी दखल घेतली, त्यासोबतच जिल्हा परिषदचे सदस्य तथा शिक्षण समितीचे सदस्य पृथ्वीराज अवताडे यांनी दखल घेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा रेखाताई कारेवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या शिक्षण समितीच्या सभेत ‘त्या’ शिक्षकाच्या नेटवर्क मार्केेटिंगचा विषय उपस्थित करीत, विना परवानगी विदेशवारी करणाऱ्या  शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले, यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी निलंबनाची कारवाईचे समर्थन केले, दरम्यान शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती आहे.

सदर शिक्षकावर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे यांनी येत्या सोमवारी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार करणार असल्याचे दे धक्का एक्सप्रेसच्या प्रतिनिधीसोबत बोलताना सांगीतले, जो पर्यंत शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नसल्याचे अवताडे यांनी दे धक्काशी बोलताना सांगितले.