भाजपा महिला मोर्चा तर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

महिलाचा उस्फूर्त सहभाग

संकेत खोब्रागडे गडचिरोली : भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा राजमाता जिजाऊ बहुदेशीय महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष रेखाताई डोळस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चा तर्फे हळदि कुंकवाचा सामाजीक कार्यक्रम गडचिरोली येथे नुकताच घेण्यात आला, सदर कार्यक्रमात महिलाचा मोठा प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्रुत्वातील भाजपा सरकरने महिलांकरीता राबवित असलेल्या विविध योजनाची माहिती व त्यायोजना लाभ कशा पद्धतीने  घ्यायचा याची सविस्तर माहिती महाराष्ट्र प्रदेश सदस्य रेखाताई डोळस यांनी यावेळी दिली.

सदर कार्यक्रमाला हळदी वच्छलाबाई मुनघाटे, श्रीमती कोडापे, अली मँडम, पठाण मँडम, गीताताई कुडमेथे, संघमित्रा खोब्रागडे, करकाडे ताई, हर्षे ताई, रुमनताई ठाकरे, वंदनाताई मसराम व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

हळदी कुंकवाच्या या सामाजिक कार्यक्रमात वाण, सान्निध्यात सेनिटायझर, मास्क देऊन दोन्ही कोव्हिड लस घेण्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.