विनापरवानगी विदेशवारी करणाऱ्या ‘‘त्या’’ शिक्षकांवर कारवाई करण्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश

दे धक्काच्या ‘त्या” वृत्ताची गंभीर दखल

आकाशभरारी घेणाऱ्या “त्या” शिक्षकाच्या वृत्ताने बिंग फुटले

मंगेश पोटवार, मूल
नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायात आकाशभरारी घेणाऱ्या “त्या” शिक्षकासंबधाने दे धक्का एक्सप्रेसमध्ये मागील काही दिवसापासुन वृत्त मालीका चालविली होती, त्यामालीकेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना विनापरवानगी विदेशवारी करणाऱ्या ‘‘त्या’’ शिक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासुन मूल तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक ऑस्टेलीयाच्या एका नेटवर्क मार्केटींग कंपनीच्या व्यवसायात आकाशभरारी घेत असल्याचे वृत्त दे धक्का एक्सप्रेस मध्ये मागील अनेक दिवसापासुन वृत्त मालीका चालविली होती. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने हा विषय उपस्थित करीत, शिक्षणाधिकाऱ्याच्या माध्यमातुन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे यांनी केली होती.

मूल तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत सहा. शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकाने शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम कमी करून केवळ पैश्याच्या लालसेपोटी नेटवर्कींग मार्केटिंगचे काम मोठया प्रमाणावर करीत आहे, सदर कंपनी ही ऑस्टेलियाची नामांकीत कंपनी असल्याने त्यांचे वेढ त्याशिक्षकाव्यतिरीक्त काही शिक्षकांना आणि इतर कर्मचारी वर्गाला लागले असुन तो मास्टरमाईंड शिक्षक नेटवर्क मार्केटिंगच्या धंदयात मोठया आर्थिक नफ्याचे लोभ दाखवून अनेक शिक्षकांना सामिल करून घेत आहे.

मागील दिड वर्षापासुन कोरोना संक्रमणामुळे जिल्हा परिषद शाळेला सुट्टी दिली होती, याचाच फायदा घेत जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायात मोठया प्रमाणात गुंतले आहे. मूल तालुक्यातीलही एका शाळेतील सहा. शिक्षकांनी नेटवर्क मार्केटींगमध्ये ‘‘आकाश’’भरारी घेतल्याने त्यांच्यासह जिल्हातील काही शिक्षक विदेशात जाऊन आले, विदेशात जाण्यासाठी वरिष्ठाांकडुन परवानगी घेणे गरजेचे होते परंतु काही शिक्षकांना परवानगी मिळवुन जाणे आवश्यक वाटले नाही, यामुळेच त्यांनी परवानगी न घेताच विदेशवारी करून आले, विनापरवानगी विदेशवारी करणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना दिले आहे.