अस्वलाच्या हल्यात इसम जखमी

बफर क्षेत्रातील घटना

मूल (प्रतिनिधी) : वन्यप्राण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वनविभागाच्या बफर क्षेत्रातील करवन टोला येथील एका इसमावर अस्वलाने हल्ला करुन जखमी केल्याची घटना शुक्रवारी कक्ष क्रमांक 763 येथे घडली. रामदास गोविंदा सिडाम वय 45 वर्ष असे जखमी इसमाचे नाव आहे.

मूल तालुक्यातील करवण टोला येथील रामदास गोविंदा सिडाम हे शेतातील धान पिकाला पाणी करायला गेले होते. पाणी करुन घरी परत येत असताना अस्वलाने त्याच्यावर  हल्ला केला यात रामदास यांच्या डोक आणि कानाला गंभीर दुखापत झाली. सदर माहिती करवण गावातील पी आर टी ग्रुपला ला देण्यात आली. जखमी इसमावर मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले.

यावेळी वनविभागाच्या बफर क्षेत्राचे क्षेत्र सहा. जोशी, वनरक्षक बंडू परचाके व वनकर्मचारी उपस्थित होते.