सहकारी राईस मिल ते आरटीएम पर्यत चा रस्ता बांधकाम करण्याची मागणी.

चिमूर भाजयुमो अध्यक्ष बंटी वनकर यांच्या नेतृत्वात एसडीई कडे केली तक्रार

प्रमोद मेश्राम चिमूर : चिमूर कांपा मुख्य मार्गाचे मंजूर बांधकाम सुरू असताना अचानक राईस सहकारी मिल ते राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय पर्यत रस्ता काम थांबविण्यात आल्याने जनतेला नाहक त्रास होत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तेंव्हा चिमूर शहर भाजयुमो अध्यक्ष बंटी वनकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यासह पिडब्लूडी एसडीई यांना निवेदन देऊन रस्ता बांधकाम पूर्ण करण्याची मागणी वजा तक्रार केली आहे.

चिमूर सहकारी राईस मिल पासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय पर्यत रस्ता बांधकाम बंद ठेवला असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी शहर अध्यक्ष बंटी वनकर यांचे नेतृत्वाखाली पिडब्लूडी एसडीई उपगलवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्रेयस लाखे, अमित जुमडे, गुणवंत चटपकर, राकेश भोयर, सुरज बनकर, गोलू मालोडे, दिनेश रामटेके, पलाश तळवेकर, प्रशांत भोपे, तुषार रासेकर, उत्कर्ष मोटघरे, पवन वंजारी, भुपेंद्र गुळधे, अमित पंचभाई उपस्थित होते.