बौद्ध विहार पिपर्डा येथे रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी 

  1. बौद्ध विहार पिपर्डा येथे रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी 

प्रमोद मेश्राम चिमूर :- दिनांक ७ फेब्रूवारी २०२२ रोज सोमवारला माता रमाई यांची १२४ वी जयंती समता सैनिक दल आणि बौद्ध महासभा शाखा पिपर्डा यांच्या वतीने आयोजित करण्यात आली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आजन्म स्वतःला वाहून घेणा-या या त्यागी रमाईमुळेच आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ठरले आणि त्यांच्यामुळे प्रत्येक महिला आज उच्चपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्याचे सर्व श्रेय हे माता रमाईला द्यावे लागेल. त्यांचा हा त्याग आज देशातील सर्व बहुजन समाजातील स्रियांना मोलाचा ठरला आहे.

कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय हरिहर जी चुनारकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून निशांत गजभिये सर, प्रमोद मेश्राम ,बबन शेन्डे, योगेश खोब्रागडे सर, मनोज खोब्रागडे, तन्मय गोंडाणे, बबिता मेश्राम, यामिना गजभिये, आणि सर्व बौद्ध उपासक आणि उपाशीका उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक रविना रामटेके तर सूत्र संचालन संघदीक्षा चुनारकर यानी केलं आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्वेता रामटेके,यांनी केलं कार्यक्रमाचा शेवट त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आला…