ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्यावर आली अग्निशमन वाहन
चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूर वरून गडचिरोली ला प्रवाशी घेऊन जाणाऱ्या वाहणाला अचानक आग लागल्याने ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना लोहारा जवळ घडली. वाहन जळून खाक झाल्यानंतर अग्निशमन वाहन घटनास्थळावर पोहोचली.
चंद्रपूर मूल गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवाशी वाहतूक होत आहे. दरम्यान चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे जाणारी क्रिष्णा ट्रॅव्हल्स क्र. एम एच 33 – 1024 हे वाहन लोहारा जवळ येऊन अचानक पेट घेतल्याने, प्रवाशी वाहणाखाली उतरले, यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अग्निशमन वाहन तात्काळ पोहोचली नाही यामुळे ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली.
यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती, पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करीत आहे.