भीम क्रांती प्रहार संघटना व बौद्ध समाज पंचकमेटी चिचाळा (कु.) यांच्या संयुक्त विध्यमाने माता रमाई ची जयंती साजरी

प्रमोद मेश्राम चिमूर:- दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोज सोमवार ला नालंदा बौद्ध विहार चिचाळा (कु.) येथे त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची 124 वि जयंती साजरी करण्यात आली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश वाघमारे यांनी केले तसेच राकेश धनविजय पियुष धनविजय,विकास धनविजय,निलेश धनविजय यांनी रमाई च्या जीवनावर प्रकाश टाकला व गौतम धनविजय यांनी सूत्रसंचालन तर प्रतीक शंभरकर यांनी आभार मानले गावकऱ्यांकडून कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.