श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना भाजपा तर्फे श्रद्धांजली

मूल (प्रतिनिधी) :  भाजपा शहर शाखेच्या वतीने श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली चा कार्यक्रम भाजपा कार्यालयात घेण्यात आला.

यावेळी उपस्थितांच्या मान्यवरांच्या हस्ते श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजलि वाहण्यात आली. व यानिमित्ताने ‘समर्पण दिनाचे’ औचित्य साधून मूल शहरात ‘भाजपा निधी संकलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाला मूल भाजपा चे अध्यक्ष प्रभाकर भोयर, सरचिटणीस चंद्रकांत आष्टनकर, नगरसेवक प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत लाडवे, प्रशांत बोबाटे, प्रमोद कोकुलवार, राकेश ठाकरे, सूरज मांदाडे उपस्थित होते.