अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस हवालदाराचा मृत्यु

सालेकसा (प्रतिनिधी) : कर्तव्यावर रूजु होण्यासाठी दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात पोलीस हवालदार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी आमगाव देवरी मार्गावर अंजोरा जवळ घडली. विजय फागु उईके वय 30 वर्षे असे अपघातात ठार झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

गोंदीया जिल्यातील सालेकसा पोलीस ठाण्यात विजय फागु उईके हे पोलीस हवालदार म्हणुन कार्यरत होते, शनिवारी साकाळी आमगाव वरुन ते सालेकसा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर रुजू होण्यासाठी दुचाकीने (एमएच ०४ जेएन ३१३७) जात होते. दरम्यान हा अपघात घडला. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा पार चुराडा झाला.

घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.