कारची दुचाकीला जबर धडक

गोंडपिपरी प्रतिनिधी:- गोंडपिपरी तहसील कार्यालय समोरील हायवेवर  आज चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे.जखमी दुचाकीचालकाचे नाव  डॉ. योगेश मडावी असे आहे.

ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे कार्यरत असलेले डॉक्टर योगेश मडावी दूचाकीने ग्रामीण रुग्णालयात जात असताना गोंडपीपरी तहसील कार्यालया समोरील हायवेवर मंडल अधिकारी प्रकाश सुर्वे यांच्या ब्रिजा MH 34 BF 2555 चारचाकी वाहनाने -Mh34DH0487 दुचाकीला जबर धडक दिली. यात डॉ. योगेश मडावी गंभीर जखमी झाले.

डॉ. योगेश मडावी गंभीर जखमी झाल्याचे कळताच जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ अगडे यांनी प्राथमिक उपचार करून जखमी डॉ मडावी यांना चंद्रपुर येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

घटनास्थळी ठाणेदार जीवन राजगुरू, पोलीस कर्मचारी मडावी, अनिल चव्हाण, गणेश पोदाळी पोहचून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहेत.