तीन आरोपींना अटक: वनविभागाची कारवाही

राजुरा प्रतिनिधी:- राजुरा सुमठणा फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक चितळ जागीच ठार झाला. सूबई इंदिरानगर येथील काही नागरिकांनी याची माहिती वनविभागाला न देता त्या मृत चीतळाचे मास कापून नेल्याचा प्रकार घडल्याने सदर प्रकरणी तीन आरोपीला अटक करण्यात आलेली असून सदर कारवाही रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

राहुल बालाजी कोडापे (१७), मारोती कारु कंबाडे (५०), संजय रामचंद्र लोखंडे (२७) हे सर्व रा. सुबई इंदिरानगर आरोपीची नावे असून सदर आरोपीवर वन्यजीव १९७२ संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.