वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे दोन जनावर ठार 

शेतकरी आर्थिक संकटात

प्रमोद मेश्राम चिमूर:- चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील जवळच असलेल्या आजगाव येथील शेतकऱ्याची दोन जनावरे वाघा ने हल्ला करून दोन्ही जनावरांना जागीच ठार केले.

सदर घटना पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली असून यामध्ये नारायण घ्यार यांची गाभण गाय व उमेश देशकर यांची कालवड ठार केली.

या घटनेची माहिती मिळताच चिचाळा कुणबी येथील ग्रा.प. सदस्य गौतम धनविजय व त्यांचे सहकारी राकेश धनविजय ,निलेश धनविजय व संदेश वाघमारे घटना स्थळी पोहचून वनविभागाला माहिती दिली.

सदर घटनेने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे.