सिंदेवाही मुल मार्गावर भीषण अपघात

तीन युवक जागीच ठार

सिंदेवाही प्रतिनिधी:- सिंदेवाही मुल मार्गावरील मातोश्री राईस मिल मूरमाळी जवळ ट्रक आणि दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन तीन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली.

सिंदेवाही वरून मुल मार्गे जाणाऱ्या ट्रक गाडी क्रमांक एम.एच- ३४ एबी.९७८१ आणि सरडपार वरून सिंदेवाही मार्गे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच – ३४ एझेड ५३५० हे दोन्ही वाहने मातोश्री राईस मिल मुरमाळी जवळ समोरासमोर धडक दिल्याने दुचाकी वरून जाणारे राकेश रामदास मेश्राम (१६) सिंदेवाही, विवेक राजेंद्र नाहणे (११) मोटेगाव ता. चिमूर,रोशन विठ्ठल मेश्राम (२५) कचेपार ता. सिंदेवाही हे तीन युवक जागीच ठार झाले.

घटना स्थळावरून ट्रक चालक फरार झालेला असून सदर घटनेची चौकशी सिंदेवाही पोलीस करीत आहे.