ऊर्जानगर परिसरात वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार

चंद्रपूर प्रतिनिधी:- चंद्रपूर शहरातील वीज निर्मिती केंद्रात काल रात्री १०.३० च्या सुमारास पट्टेदार वाघाने कामावरून घरी परत जाणाऱ्या मजुरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की भोजराज मेश्राम वय ५९ वर्षे हे सिटीपिएस मधील कुणाल कंपनीत युनिट क्रमांक ८ व ९ मधील बेल्ट चा काम करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून कामावरून घरी परत येत असताना रस्त्यावर दबा धरून असणाऱ्या पट्टेदार वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले परंतु अजूनपावेतो त्यांचा शव मिळालेला नसून पुढील शोध वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.