गोंडपिपरी प्रतिनिधी:- गोंडपिपरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जमाती(खुला) राखीव होते.काँग्रेस ७,भाजपा ४,शिवसेना,२,अपक्ष२,राष्ट्रवादी २ असे पक्षीय बलाबल होते तर दोन अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
नगराध्यक्ष पदासाठी तीन नामनिर्देशन दाखल झाले त्यात काँग्रेस कडून सविता कुळमेथे ,भाजपातर्फे मनीषा मडावी,रा.कॉ कडून सविता चंदेल.बुधवारी राकॉच्या चंदेल यांनी माघार घेतली.काँग्रेस-भाजपात नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होती.लढतीत ११ ,६ ने काँग्रेसच्या सविता कुळमेथे यांनी बाजी मारली तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या सारिका मडावी अविरोध निवडून आल्या शिवसेनेने गड राखला.
आमदार सुभाष धोटे,माजी नगराध्यक्ष अरुण धोटे,जिल्हा प्रमुख गिऱ्हे,जिल्हा उपप्रमुख संदिप करपे,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले यावेळी शेकडो कॉंग्रेस व शिवसेना पदाधिकारी समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. केवळ दोन नगरसेवक असताना उपनगराध्यक्ष पदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडली.शिवसेनेने जिल्हा उपप्रमुख संदिप करपे यांच्या नेतृत्वात भगवा फडकवला