चंद्रपूर नगरीत नामदार आदित्यजी ठाकरे यांच्या प्रथम आगमनानिमित्य वृद्धाश्रमात हर्षल शिंदे यांच्या कडून डेजरकुलर भेट

युवा सेनाजिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांचा अभिनव उपक्रम

प्रमोद मेश्राम चिमूर :- नवनविन उपक्रम राबवून नेहमीच समाज कार्यात अग्रेसर राहणारे आणि सामाजिक सेवेचा वसा जोपासणारे युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी नामदार आदित्य ठाकरे यांच्या चंद्रपूर नगरीत प्रथम आगमनाप्रित्यर्थ पुन्हा एकदा सामाजिक उपक्रम राबवित समाज सेवेचा नवा अध्याय जनतेसमोर ठेवला आहे तो म्हणजे वृद्धाश्रमात डेजर कुलर भेट देणार आहेत वृद्धाश्रमातील वृद्धांना ही अनमोल भेट देऊन माननीय आदित्य ठाकरे साहेबांचे स्वागत करणार आहेत हा स्वागत आदित्य साहेबांचा सर्वात मोठआ स्वागत ठरणार आहे यापेक्षा दुसरे कोणते मोटे स्वागत असणार त्यामुळे युवा सेनेत नवचैतन्य ची लाट निर्माण झाली आहे

येत्या काही दिवसात उन्हाळा सुरू होणार चंद्रपुरात 48 ते 50 डिग्री सेल्सियस तापमान राहते न सहन होणारी गर्मी त्यामुळे चंद्रपुरात उष्माघाताने अनेक बळी जातात हे लक्षात घेता आदित्य साहेब आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आगमनानिमित्त वृद्धाश्रमात डेजर कुलर युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे कडून भेट देण्यात येईल जेणेकरून तिथल्या वृद्ध लोकांना उन्हाळ्यापासून आराम मिळेल त्या लोकांचा मनापासून आमच्या आदित्य साहेबांना आशीर्वाद मिळेल खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा मोठे स्वागत होऊ शकत नाही नेहमीच युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे साहेब यांचा मदत करण्याचा हातखंडा आहे मागील काही दिवसांपूर्वी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा कार्यक्रमाचा सर्व खर्च गरजू नेत्र रुग्णाला देऊन समाजात नवीन आयाम मिळवून दिला होता त्यांच्या नाविन्यपूर्ण आदित्य ठाकरे साहेबाच्या स्वागत समारोह योजनेमुळे युवासेनेत व कार्यकर्त्यांत नवीन नवचैतन्य संचारले असून सर्वच स्तरावरून त्यांच्या या कार्याला सलाम करून अभिनंदन केले जात आहे