बल्लारपूर -गोंदिया पॅसेंजर सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना पत्र !

कार्यकर्त्यांच्या मागणीची आ. मुनगंटीवारानी घेतली तात्काळ दखल

मुल प्रतिनिधी:- कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली बल्लारपूर गोंदिया पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची मागणी घेऊन मूल येथील काही सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांनी बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार याची भेट घेतली असता, मुनगंटीवारांनी तात्काळ मागणीची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विन यांना पत्र लिहीत रेल्वे सुरू करण्याची मागणी केली.

कोरोनासदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या परिस्थितीशी लढण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या त्यात रेल्वे वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली त्यात बल्लारपूर -गोंदिया पॅसेंजर ट्रेन आणि डेमो ट्रेन चा पण समावेश होता.

कोरोना परिस्थिती जसजशी आटोक्यात आली तसे सरकारने हळूहळू निर्बंध शिथिल करणे सुरू केले त्यात फक्त गोंदिया-बल्लारपूर या एकाच फेरीचा समावेश करण्यात आला आणि बाकी डेमो ट्रेन आणि बल्लारपूर गोंदिया ट्रेनची दुसरी फेरी सुरू करण्यात न आल्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना याची झळ पोहचत असून मोठा आर्थिक फटका बसत आहे.

या समस्येचे निराकरण व्हावे आणि सर्वसामान्य लोकांची गरीब वाहिनी म्हणून ओळख असलेली पॅसेंजर आणि डेमो ट्रेन सुरू व्हावी म्हणून मूल येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर कापगते, नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे,भाजपा कार्यकर्ते राकेश ठाकरे आणि चंद्रकांत आष्टनकर यांनी बल्लारपूर क्षेत्राचे आमदार माजी मंत्री आम. सुधीर मुनगंटीवार याच्या कानावर टाकताच त्यांनी रेल्वेमंत्री आश्विनजी वैष्णव यांना पत्र लिहीत प्रवाशाच्या समस्या अवगत करून तात्काळ गोंदिया-बल्लारपूर पॅसेंजर आणि डेमो ट्रेन सुरू करण्याची मागणी केली.