मुल चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात

अपघातात चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ठार

मुल प्रतिनिधी :- मुल चंद्रपूर महामार्गावरील लोहारा येथील गतीरोधकाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चिरोली येथून चंद्रपूर मार्गे जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

सदर घटना लोहारा जवळील गतिरोधक जवळ घडली असून समोरील येणाऱ्या अज्ञात वाहनांची वेग इतकी भरदाव होती की वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मेंदूचे चितळे चितळे उडाले.

सदर वैद्यकीय अधिकारी श्री. वाटोळे बजाज पल्सर गाडी क्रमांक एम एच २६ बिवी २१५५ घेऊन चंद्रपूर जात असताना घटना घडलेली असून ते प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली येथे वैद्यकीय अधिकारी होते सदर घटनेचा अधिक तपास रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here