शुल्लक कारणावरून ग्रामपंचायत सदस्यास मारहाण

मुल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल

धनराज रामटेके मुल:- मुल तालुक्यातील ग्रामपंचायत केळझर येथील ग्रामपंचायत सदस्यास शुल्लक कारणावरून गावातील तीन नागरिकांनी मारहाण केल्याची घटना १५ फेब्रुवारी २०२२ ला रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली.

सविस्तर वृत्त असे की, श्री. प्रफुल गंगाराम कलसार यांनी ग्रामपंचायती कडे स्वतःच्या घरासमोरील रस्ता मोकळा करून देणे बाबत अर्ज केलेला होता त्याबाबत सदर रस्ता खाजगी मालकीचा असल्याने ग्रामपंचायत कमिटीने त्यांना त्याच्या जागेची मोजणी करणे संदर्भात सूचना केली.

अर्जदारानी ग्रामपंचायतीच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून उलट अर्जदार व त्याच्यासोबत श्री. शामराव गंगाराम कलसार व श्री. प्रशांत शामराव कलसार सर्व राहणार केळझर यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्या विरोधात दिनांक १५ फेब्रुवारीला रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शिवीगाळ करीत असल्याचे दिसताच ग्रामपंचायत सदस्य श्री. चक्रधर गळदु मानकर यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारताच त्या तिघांनी सदस्य श्री. चक्रधर मानकर यांना मारहाण केली.

शुल्लक कारणाने मारहाण झाल्याने व्यथीत होऊन सदस्य श्री. चक्रधर मानकर यांनी सदर प्रकरणाची तक्रार मुल पोलीस स्टेशन ला दाखल केलेली असून संबधित प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती कारवाही करेल याकडे केळझर येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.