जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिला कँन्सरग्रस्त महीलेला मदतीचा हात

मूल प्रतिनिधी:-शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यममातून राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मारोडा येथील शेतकरी महीला सौ. बबीता अनिल वाळके हीला कँन्सर आजारावर उपचार करण्यासाठी ३० हजार रूपयाचे सहकार्य करण्यात आले.

बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मारोडा येथे आजारी बबीता वाळके यांचे घरी भेट देवुन मदतीचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा प्रायमरी क्रेडीड सोसायटीचे अध्यक्ष धनंजय चिंतावार, बेलदार समाज संघटना मारोडाचे अध्यक्ष अशोक पुल्लावार, ग्राम पंचायत सदस्य प्रफुल पुल्लावार, माजी सरपंच प्रभु वाळके, माजी सदस्य वामन पिंपळे, सुधाकर शेंडे आणि कमलेश वाळके आदी ग्रामस्थ आणि रूग्णाचे कुटूबिय उपस्थित होते.

आजारावर उपचार करण्या करीता आर्थिक सहकार्य केल्याबद्दल रूग्णाच्या नातेवाईकांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे आभार मानले.