शिवणपायली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न

भीमसैनिक युवा शाखा शिवनपायली

 

प्रमोद मेश्राम :- चिमूर तालुक्यातील शिवनपायली येथे अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम भीमसैनिक युवा सेना शाखा शिवणपायली च्या वतीने शासनाच्या नियमावलीचे पालन करुन पार पडला.

त्या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणुन श्री बालकदास पाटील (कार्याध्यक्ष) भीमसैनिक युवा सेना शाखा, शिवणपायली आणि प्रमुख उपस्थिती श्री. जनार्धन डेकाटे, भीमसैनिक युवा सेना शाखा, अद्यक्ष उद्धव डेकाटे बौद्ध पंचकमेटी,सचिव भाऊराव रामटेके,पोलीस पाटील महेंद्र डेकाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करुन व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व उपस्थित मान्यवर यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर मार्गदर्शन केले. संचालन प्रफुल रामटेके यांनी केले तर आभारप्रदर्शन सूरज रामटेके यांनी केले व प्रसाद वाटप करुन या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगत करण्यात आली.