उभ्या पिकातुन पाईपलाईनच्या कामासाठी रात्रौच्या वेळेस खोदकाम

गोसीखुर्दच्या अधिकाऱ्यांची दबंगशाही

सावली (प्रतिनिधी) : करोडो रूपये खर्च करून शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे काम करीत असताना गोसीखुर्दच्या अभियंत्यानी रात्रौच्या वेळेस उभ्या पिकातुन खोदकाम केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असुन यानिमीत्ताने गोसीखुर्दच्या अधिकाऱ्यांची दबंगशाही समोर आली आहे.

सावली तालुक्यातील गवर्ला शेतशिवार उत्तमचंद वाळके यांची सर्व्हे नं. 182 ही शेती आहे, याशेतात हजारो रूपये खर्च करून करडई, चना, मक्का यासह विविध पिकाचे लागवड केली आहे, मात्र गोसीखुर्द विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईनचे काम हाती घेतले असुन याठिकाणी सदर शेतकऱ्यांची परवानगी न घेताच रात्रौच्या वेळेस मोठया प्रमाणावर खोदकाम करून शेती आणि शेतातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान केलेले आहे, यामुळे लाखो रूपयाचे नुकसान शेतकऱ्या चे झालेले आहे, सदर कामामुळे शेतकऱ्या ना आर्थीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, याबाबत सावलीच्या तहसीलदारांकडे तक्रार करून विनापरवानगी शेतातील पिकाचे नुकसान करणाऱ्या गोसीखुर्दच्या अधिकाऱ्यावर कारवाई करून झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.