ना. नवाब मलिक यांच्यावर सुडबुध्दीने केलेल्या कारवाईचा समता परिषदेव्दारा निषेध

तहसिलदारांमार्फत पंतप्रधानांना दिले निवेदन

बुलढाणा प्रतिनिधी:-अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांना इ डी व्दारा अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आज दि 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्रं मोदी यांना तहसिलदार चिखली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की , केंद्रं सरकारकडून ई.डी , सि बी आय एन. आय.बी या स्वायत्तं संस्थांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाहक त्रास दिल्या जात असून खोटया नाटया प्रकरणात गुंतवून अटक करण्याचा सपाटा लावण्यात आला असून या सर्व बाबी घटने विरोधी असून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आहेत.

भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये घडणाऱ्या या घटना ह्या केंद्रं सरकारच्या राज्यकारभाराला काळीमा फासणाऱ्या आहेत देशामध्ये अनेक योजनांचा फज्जां उडाला असून महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असल्याचे देखील निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तरी या सर्व बाबी तात्काळ थांबविण्याची विनंती देखील निवेदनात करण्यात आली असून निवेदनावर अ. भा. समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता खरात , रॉ. कॉ प्रदेश प्रतिनिधी शंतनु बोंद्रे , जिल्हाउपाध्यक्ष संजय गाडेकर , ता. अध्यक्ष दिपक म्हस्के , शहरअध्यक्ष रविंद्रं तोडकर , ओ बी सी सेल चे जिल्हाघ्यक्षं सुभाष देव्हडे, रा. यु. काँ. तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ यांच्यासह पुरुषोत्तमं हाडे, नासिर कुरेशी, विनोद वनारे , विजय खरात , सागर खरात, योगेश राजे , शुभम खरात , गुलाबराव खेडेकर ,रत्नाताई सोळंकी , कल्पना केतकर , लक्ष्मी गिऱ्हे , बानोबाई जैवाळ , श्रीकांत एकडे ,सदानंद मोरगंजे , ॲड दिनेश जपे , ज्ञानदेव कालेकर , राम खेडेकर , दामोधर टेकाळे , सुनिल सुरडकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.