एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात खून

गोंदिया प्रतिनिधी:- एक तर्फी प्रेमातून प्रेयसीची प्रियकराने हातोड्याने वार करून निघृण हत्या केल्याची संतापजनक घटना गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चीरामनटोला येथे घडली.

सविस्तर वृत्त असे की अकराव्या वर्गात शिकणाऱ्या धनश्री हरिणखेडे(18) हिच्यावर दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले हा एकतर्फी प्रेम करीत होता. आरोपीने एकतर्फी प्रेम करून प्रेमासाठी अनेकदा तिच्याकडे तगादा लावला परंतु तिने त्याला साफ नकार दिला त्याचाच वचपा काढण्याकरिता दुपारी धनश्री शिकवणी वर्गावरून घरी परत येत असताना आरोपीने तिला रस्त्यावरच अडवले आणि तिच्यासोबत वाद घालत सोबत आणलेल्या हातोड्याने तिच्या डोक्यावर वार करून जागीच ठार केले.

सदर घटनेची माहिती नागरिकांना मिळाल्याने नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली सदर घटनेचा पुढील तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here