मांगली येथील प्रयोगशील शेतकरी अजय पिंपळकर यांनी केली मोहरी या तेलपिकाचे लागवड

अतुल कोल्हे भद्रावती :-तालुक्यातील मांगली येथील प्रयोगशील शेतकरी अजय पिंपळकर यांनी लागवड केलेल्या मोहरी या तेलपिकाचे प्रक्षेत्र भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर, यांनी पाहणी केली.

जंगली प्राण्यांपासून पिकाचे नुकसान होत असल्यामुळे जंगलाला लागून असलेले शेतकरी खरीप पीक घेतल्यानंतर रब्बी मधील पीक घेत नाही. त्यामुळे जमीन ही खाली राहते. परंतु मोहरी या पिकाला जंगली प्राणी खात नसल्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही. कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे हे पीक आहे. त्यामुळे भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी भातानंतर मोहरी हे पीक घ्यावे. मोहरीचे तेल खायला चांगले असून, आरोग्याला लाभकारी आहे. त्यामुळे मोहरी या पिकाची जवस व करडई या पिकाप्रमाणे मोहरी या पिकाची सुद्धा शेतकऱ्यांनी लागवड करावी. तसेच जिल्ह्यातील तेल पीकाखालील क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करावा असे शेतकऱ्यांना आव्हान केले.

यावेळी पिकाची प्रक्षेत्र पाहणी करन्याकरिता कु. मोहिनी जाधव, तालुका कृषी अधिकारी, भद्रावती, पी. जी. कोमटी, मं. कृ. अ. चंदनखेडा, यु बी झाडे, मं. कृ. अ. भद्रावती, पी एम ठेंगणे, कृ प भद्रावती, सुधीर हिवसे, स. तं. व्य. भद्रावती, पी एस इंगळे, अनिल भोई, प्रदीप काळे, कृषी सहाय्यक उपस्थित होते.