योध्दा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे आरोग्यविषयक निःशुल्क शिबिर संपन्न

१३९ जेष्ठ नागरिकांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ

माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरा अवताडे यांनी केले मार्गदर्शन व तपासणी

अतुल कोल्हे भद्रावती :- मानवी देह ही देवाने आपल्याला दिलेली मोठी देणं आहे.त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे आपली नैतिक जबाबदारी आहे.त्यासाठी नियमितपणे व्यायाम व आहार नियंत्रण करून आरोग्याचे जतन केले पाहिजे असे विचार माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुरा अवताडे यांनी व्यक्त केले.त्या विवेकानंद महाविद्यालय परीसरात असलेल्या योध्दा संन्यासी क्लिनिक येथे जेष्ठ नागरिकांसाठी आयोजित निःशुल्क आरोग्य मार्गदर्शन व तपासणी शिबीरात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, मार्गदर्शक प्राचार्य डॉ नामदेव उमाटे होते.पुढे बोलताना डॉ.अवताडे यांनी जेष्ठ नागरिकांना निरामय आरोग्य जपण्यासाठी विशेष टिप्स दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचीव माधव कौरासे, आभार कोषाध्यक्ष विठ्ठल मांडवकर यांनी केले.यावेळी योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुद्देशीय पालक – मित्र मंडळाचे कार्यकारणी सदस्य प्रा.धनराज आस्वले, कु. किरण साळवी, अण्णा कुटेमाटे, पंढरी गायकवाड यांच्यासह अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कोवीड नियमांचे काटेकोरपणे पालन करीत संपन्न झालेल्या या शिबिरात यावेळी शहरातील १३९ जेष्ठ नागरिकांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला.