पिण्याच्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे केळझर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांनी दिला आंदोलनाचा ईशारा

मुल

पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चिरोली परिसरात सट्टा तेजीत

युवापिढी सट्टयाच्या आहारी

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजा केळझर येथे पाणी पुरवठा योजनेद्वारे दूषित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा होत असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकामार्फत बोलले जात आहे.

केळझर येथील पाणी पुरवठा योजना हि 40 वर्षापूर्वीची असून पूर्णतः जीर्ण अवस्थेत झाली असल्याने व टाकीला भेघा पडल्यासारखे असल्याने जलसूरक्षक पाण्याच्या टाकीवर चढून ब्लिचिंग टाकू शकत नाही किंवा पाण्याचे शुध्दीकरण सुध्दा करू शकत नसल्याने गावात दूषित पाणी पुरवठा होत आहे.

याबाबत ग्रामपंचायतींनी वारंवार कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर तसेच उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग सिंदेवाही यांचेकडे पाठपुरावा केलेला आहे परंतु संबधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

संबधित विभागाच्या दुर्लक्षामुळे यापूर्वी दिनांक 12 मे 2121 ला टाकीचे स्लप कोसळून एका मजुराचा मृत्यू झालेला असताना सुद्धा संबधित विभाग याकडे का दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्न केळझर येथील नागरिक करीत आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दिनांक 30 ऑगष्ट 2021 रोजी निवेदन देऊन जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नवीन पाणी पुरवठा नळयोजना मंजूर करण्याबाबत विनंती करण्यात आलेली होती परंतु याबाबत कुठलीही ठोस कार्यवाही झाल्याचे अजूनपर्यंत निदर्शनास येत नाही

सबंधित विभाग मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून जर तात्काळ मागणी पूर्ण झाली नाही तर गावातील नागरिक जनआंदोलन करेल असा इशारा ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती काजू खोब्रागडे, सदस्य श्री चक्रधर मानकर, सदस्य श्री. प्रमोद नीमगडे यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.