राज्यस्तरीय रब्बी स्पर्धेत कोल्हापूर व परभणी संघ विजयी

मुलांन मध्ये कोल्हापूर तर मुलींनमध्ये परभणी संघ विजयी

अतुल कोल्हे भद्रावती : क्रीडा संकुल भद्रावती येथे झालेल्या राज्यस्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धेत मुलांचा कोल्हापूर संघ विजयी झाला तर मुलींमध्ये परभणी संघाने बाजी मारली.

रब्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि चंद्रपूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत आयोजित राज्यस्तरीय सबज्युनियर रब्बी स्पर्धेत महाराष्ट्रातील ३५ जिल्हा संघ सहभागी झाले होते यात मुलांमध्ये विजेता संघ कोल्हापूर उपविजेता मुंबई उपनगर तृतीय क्रमांकावर नांदेड संघ राहिला तर मुलींमध्ये विजेता परभणी राहिला उपविजेता उस्मानाबाद तृतीय संघ कोल्हापूर राहिला. बक्षीस वितरण कार्यक्रमाला मुख्य महाप्रबंधक आयुध निर्माणी विजय कुमार ,नगराध्यक्ष अनिल धानोरकर, क्रीडा अधिकारी भारतीय, क्रीडा सचिव उज्ज्वल किशोर, एन पी मलिक, ऍड मिलिंद रायपुरे, डॉक्टर दिलीप बगडे उपस्थित होते विजेता उपविजेता संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.