उन्हाळा लागण्यापुर्वीच पाण्यासाठी गावकऱ्याची भटकंती

कंपनी मार्फत टॅंकरनी पाणी पुरवठा

नंदु झोडे वरोरा: तालुक्यातील बेलगाव येथील विहीर आणि हातपपाचे पाणी आटल्याने नगारीकांना पाण्यासाठी इतरात्र भटकावे लागत आहे, उन्हाळा लागण्यापुर्वीच पाण्यासाठी भटकंती होत असल्याने प्रशासनाने पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

तालुक्यातील बेलगावची लोकसंख्या 1 हजारच्यावर आहे, विहीर आणि हातपंपाच्या माध्यमातुन नागरीकांची पाण्याची तहान भागविली जात आहे, परतु गावाच्या जवळच कोलमाईस कंपनी असल्याने पाण्याचे असलेले स्त्रोत कोरडे पडत आहे, यामुळे उन्हाळा लागण्यापुर्वीच नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हीच परिस्थतील बेलगाव परीसरातील गावांची असुन तेथीलही पाण्याचे स्त्रोत कोरडे पडायला सुरूवात झालेली आहे, यामुळे कंपनी मार्फत टॅंकरनी पाणी पुरवठा केल्या जात आहे. दरम्यान नागरीकांची पाण्यासाठी लांब रांग लागत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी नागरीक करीत आहे.