काँग्रेेसचे माजी गटनेता, नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला

रुग्णालयात उपचार सुरू

चंद्रपूर (प्रतिनिधी) : मार्निग वाक साठी गेलेले कॉंग्रेसचे माजी गटनेता तथा नगरसेवक नंदु नागरकर यांच्या काही गुंडाकडुन हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना चंद्रपूर येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स जवळ सकाळी घडली.

कॉंग्रेसचे नेते, चंद्रपूर महानगर पालीकेचे माजी गटनेते तथा नगरसेवक नंदु नागरकर हे नेहमीप्रमाणे सकाळी मार्निग वॉक साठी गेले होते, दरम्यान मित्रासोबत गप्पा-गोष्टी करून दुचाकीने जात असताना रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ अज्ञात व्यक्तीनी सुसाट वेगाने वाहन चालवीत असल्याचे दिसून आल्याने नंदू नागरकर यांनी त्यास हटकले असता तो व्यक्ती नागरकर यांचेशी वाद घालू लागला, त्यानंतर 3 व्यक्तीनी चेहरावर रूमाल बांधलेल्या अवस्थेत येवुन नागरकर यांचा रस्ता अडवून त्यांना चांगलीच मारहाण करीत पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांनी नंदू नागरकर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले

चंद्रपूर महानगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर नंदू नागरकरावर झालेला हल्ला हा कुणाच्या निर्देशावरून तर नाही झाला ना अशा अनेक तर्क-वितर्काना उधाण आले आहे मात्र या हल्ल्यात नागरकर यांना गंभीर दुखापत झालेली आहे.