भद्रावतीचा गायक एलविन दडमल आंतरराष्ट्रीयस्तरावर

इटालियन गायिकेसोबत गायिले गीत

अतुल कोल्हे भद्रावती:- येथील युवा गायक आणि गीतकार एलविन दडमल याने स्वतः लिहिलेले आणि इटालियन गायिकेसोबत गायीलेले झूम-झूम हे रॅप गीत आंतरराष्ट्रीय सिने जगतात धूम मचवित असून भद्रावतीच्या या युवा गायकामुळे भद्रावती शहराचे नांव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

एलविन हा येथील सेवानिवृत्त नायबतहसिलदार के. झेड. दडमल यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला गितलिखान व गायनाची आवड आहे. त्याने लिखीत ” झूम – झूम ” हे रॅप गीत इटालियनची सुप्रसिद्ध गायिका जिकोकोंडा वेसीचली सोबत गायिले आहे. हे गीत इटालियन दिग्दर्शन मौरो रुसो, सहदिग्दर्शक जिओकोंडा वेसीचली यांच्याद्वारे चित्रित करण्यात आले असून हे गीत ऍपल म्युझिक, यु-ट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटरवर उपलब्ध आहे.

एलविन याच्या या आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रातील यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.