भरधाव ट्रकची मोटार सायकलला धडक

दोन मजूर गंभीर जखमी

घुग्घुस (प्रतिनिधी) : दुचाकी वाहनाने कंपनीमध्ये कामामध्ये जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनी धडक दिल्याने दोन मजूर जखमी झाल्याची घटना वर्धा नदीवर मंगळवारी दुपारी 2 वाजता दरम्यान घडली.अपघातात भद्रावती येथील तरुणकुमार दयाल कुशवा आणि जितेंद्र कुमार झा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

वेकोलि वणी परिसरातील पैनगंगा खाणीतील माती उत्खनन कंपनीत काम करण्यासाठी भद्रावती येथील रहिवासी तरुणकुमार दयाल कुशवा आणि जितेंद्र कुमार झा हे दोघे एमएच 34 बीजे 8012 या दुचाकीने जात होते, दरम्यान विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत असलेला 18 चाकी ट्रॅक क्र. एमएच 34 बीझेड 4023 ने मोटार सायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की मोटर सायकलचा चक्काचूर झाला. आणि दुचाकीने जात असलेले तरुणकुमार दयाल कुशवा आणि जितेंद्र कुमार झा हे दोघे गंभीर जखमी झाले

ट्रक चालक घटनास्थळावरून पसर झाला पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.