शाळा व्यवस्थापन समितीच्या अद्यक्ष पदी राजू आत्राम यांची बिनविरोध निवड

प्रमोद मेश्राम चिमूर:- जील्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसगांव (पि) शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी निवडी बिनविरोध झाल्या.

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी व्यवसाय या क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असलेले राजू कवळू आत्राम यांची बिनविरोध निवड झाली.तर उपादयक्ष पदी माधुरी अनंता कामडी यांची निवड झाली आहे.

या वेळी सदस्य पदी संदीप ढोक,होमराज आत्राम,राकेश राजूरकर,सविता शेरकुरे, रागिना आत्राम यांची सदस्य पदी निवड झाली आहे.या निवडीसाठी सचिव फुलझेले मुख्यद्यापक,कामडी सर यांनी काम पाहिले

पूर्णवेळ काम करणाऱ्या अध्यक्षाची नेमणूक झाल्यामुळे गावातील शिक्षणासाठी व उद्याचे सजग नागरिक घडवण्यासाठी या नवनिर्वाचित अध्यक्षांचा नक्कीच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना फायदा होईल, विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी योग्य प्रतिनिधी योग्य पर्यंत हे अध्यक्ष नक्कीच पोहोचतील व पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अविरत कार्य करतील असा विश्वास गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.