विद्यार्थ्यांनी केली पथनाट्यातून कोरोनावर जनजागृती

एसपी महाविद्यालयाचे आयोजन
लसीकरणाचे महत्व केले विषद

विसापूर  (प्रतिनिधी) : कोरोना संक्रमन काळाचे शुलकाष्ट आपल्या मागे लागले होते. याची भिष्णता साऱ्यांनी अनुभवली.या भयावाह काळाने साऱ्यांची दैना केली. यावर मात करण्यासाठी कोरोनाचे लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र काहींनी याबाबत दुराग्रह बाळगला. अजुनही काही जण कोरोना लसीकरणापासून वंचित आहे. सर्वांनी आरोग्य विभागाच्या निर्देशाचे पालन करून लसीकरण करून घ्यावे व निरामय आरोग्याची वाट धरावी, म्हणून विसापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व राष्टसंत तुकडोजी महाराज चौकात चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोरोनावर पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती केली.

चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्या चा अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक आले आहे. कोरोना काळ व युवाशक्ती अंतर्गत विसापूर येथे पथनाट्य पार पडले.

यामध्ये आकाश मडावी, रोहित मोहुर्ले, सिद्धांत निमसरकार, अजय मोहुर्ले, प्राची मेश्राम, आकांक्षा शहारे, संजना गजमवार, क्रिष्णा भिसे, दिक्षा कोतकीडवर, दर्शन मेश्राम, विश्वाजित नायक, इजाज शेख, अविनाश चोले आदी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलेचे दर्शन घडविले. त्यांनी आपल्या कलागुणातून कोरोना काळातील मृत्यूची भीष्णता,जीव वाचावा म्हणून रुग्णांची धडपड व पहिल्या लाटेपासून तिसऱ्या साऱ्यांची घालमेल, याचे पथनाट्यातून दर्शन घडवले.

प्राचार्य डाँ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या पथनाट्याला राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डाँ. कुलदीप गोंड, डाँ. उषा खंडाळे, डाँ. पुरुषोत्तम माहोरे, डाँ. डाँ. वदंना खनके, डाँ. निखिल देशमुख, विसापूच्या सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य सुरज टोमटे, गजानन पाटणकर, डाँ. राजकुमार बिरादार यांची उपस्थिती होती.