व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘सॉरी’ लिहून केले विषप्राशन

पोलिसांनी केले मर्ग दाखल

गोंडपिपरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांदगाव येथील एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेट्स ठेवून विष प्राशन करून स्वतःला संपविल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव फुर्डी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. संतोष मुरलीधर पिपळशेंडे (रा. नांदगाव) असे मृत्तकाचे नाव आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव येथील संतोष मुरलीधर पिपळशेंडे हा गुरुवारी  आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सॲपवर ‘सॉरी’ असा स्टेटस ठेवला होता. त्यानंतर रात्री आई गावात असणाऱ्या मुलीकडे झोपायला गेली होती. घटनेच्या वेळी वडील शेतात जागलीला गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत संतोषने विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रेमात भंग झाल्याने हे कठोर पाऊल उचलले असावे, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविला जात आहे.

घटनास्थळी गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी गौरकार, चव्हाण, कोवे पोहोचून मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.