विचीत्र अपघातात 2 ठार, 3 गंभीर जखमी, तर 1 किरकोळ जखमी

जखमींवर उपचार सुरू: पोलीसांचा तपास सुरू

वर्धा (प्रतिनिधी) : काही दिवसांपुर्वी वैद्यकीय शिक्षण घेणाÚया विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना त्याच ठिकाणी विचीत्र अपघात होवुन दोन जण ठार, 3 जण गंभीर जखमी तर 1 किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. रेयांश राकेश चाफलेला वय 4 वर्षे आणि नरेंद्र भुराजी जुगनाके वय 28 वर्षे यांचा मृत्यू झाला आहे. तर चंद्रशेखर वाट वय 30 वर्षे,, ललिता राकेश चाफले वय 36 वर्षे,, गोल्डी सिंग वय 37 वर्षे हे गंभीर जखमी आहे, जोग सिंग वय 32 वर्षे हे किरकोळ जखमी आहेत. जखमींवर सावंगी मेघे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वर्धा जिल्हयातील सावंगी येथील सेल्सुरा परिसरातुन जात असताना रानडुक्कर आडवा गेल्याने इंडिका चारचाकी वाहनाचा अपघात झाला, अपघातातील व्यक्तीना बाहेर काढण्यासाठी दुचाकीने जाणाÚया एका व्यक्तीने मदत करण्यासाठी गेले असता रस्त्याच्या कडेला एक महिला आणि लहान मुलगा उभा होता, दरम्यान भरधाव वेगाने जाणाÚया फॉर्च्युनर वाहनाने अपघातग्रस्त इंडिका वाहनाला जोरधार धडक दिली. व बाजुला असलेल्या महिला आणि लहान मुलालाही फॉर्च्युनरने उडविले, त्यासोबतच यवतमाळकडे जाणाÚया दुचाकीलाही फॉर्च्युनरने चिरडले, याअपघातात देवळी येथील रेयांश राकेश चाफलेला वय 4 वर्षे, यवतमाळ जिल्ह्यतील दिघी येथील नरेंद्र भुराजी जुगनाके वय 28 वर्षे याचा मृत्यु झाला. तर तर चंद्रशेखर वाट वय 30 वर्षे,, ललिता राकेश चाफले वय 36 वर्षे,, गोल्डी सिंग वय 37 वर्षे हे गंभीर जखमी आहे, जोग सिंग वय 32 वर्षे हे किरकोळ जखमी आहेत. जखमींवर सावंगी मेघे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनेकाना चिरडणारी फॉर्च्युनर वाहन पुलाच्या खाली जाऊन आदळली, मात्र वेळीच बलून उघडल्यामुळे कारमध्ये असलेल्यांना कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र फॉर्च्युनर वाहनातील सर्व प्रवाशी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पेालीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला, पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.