बळीराम काळे जिवती : आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते जिवती तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाले. यात खनिज विकास निधी अंतर्गत मौजा मारई पाटण येथे वाचनालय इमारत बांधकाम करणे, किंमत २० लक्ष, मौजा भारी येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम करणे, किंमत २० लक्ष, स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजा भारी येथे आदिवासी समाज सभागृह (गोटुल) इमारत बांधकाम करणे, किंमत २५ लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मौजा भारी येथे भरिकर कोटनाके परिवार डेव्हलमेंट सोसायटी भारी व्दारे आयोजित आदिवासी बांधवांचा मेळावा घेण्यात आला. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव कोटनाके, प्रमुख अतिथी अध्यक्ष आदिवासी विकास प्रकल्प भीमराव पाटील मडावी, तहसीलदार मंचेरियल रघुनाथ कोटनाके, विजयराव कोटनाके, लिंगु पाटील कुमरे, सभापती अंजनाताई पवार, सत्तरशाह कोटनाके,कंटू कोटनाके अध्यक्ष युकाँ, रमेश पाटील कोटनाके, मलकु पाटील कोटनाके, देवराव पाटील कोटनाके, वेंकटरावजी कोटनाके, कोटनाके नामदेवजी कोटनाके, भीमराव कोटनाके, सिताराम मडावी, शामराव कोटनाके, सुकलाल कोटनाके, जंगू वेडमे, नंदाताई मुसने, जयश्री नारोटे, कांता शिरसागर, तजुद्दिन शेख, भेंडे सर, सुधाकर नागोसे, डॉक्टर बनसोड यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविक कंटू कोटनाके, सूत्रसंचालन चंदू कोटनाके सर, आभार सत्तरशाह कोटनाके यांनी मानले.