प्रशासकीय भवनातील रमाई आवास योजनेच्या प्रसिद्धी फलकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अतिक्रमणामुळे प्रसिध्दी फलक दिसेना

मूल (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीस सरकारने रमाई आवास योजनेच्या माध्यमातुन गरीब नागरीकांना घरकुलाचा लाभ घेता यावा, यादृष्टीने मोठे प्रसिध्दी फलक लावण्यात येत आहे, मूल येथील प्रशासकीय भवनामध्येही दर्शनीभागावर प्रसिध्दी फलक लावण्यात आलेल्या आहे, सदर प्रसिध्दी फलकासमोर मोठया प्रमाणावर अतिक्रमण असल्याने नागरीकांना फलक दिसुन येत नाही, यामुळे फलकाची उंची वाढवावे  किंवा फलकासमोरील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे.

दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची अशी बिद्र वाक्य पुढे करीत रमाई आवास योजनेला दिली गती, घराच्या स्वप्नाची होणार पुर्ती यामथळयाखाली मोठे प्रसिध्दी फलक प्रशासकीय भवनात लावण्यात आलेले आहे, गरीब जनतेच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न रमाई आवास योजनेतुन पुर्ण करता यावे यासाठी प्रसिध्द फलक लावण्यात आलेले आहे, मूल येथील प्रशासकीय भवन परिसरात लावलेले प्रसिद्धी फलक मुख्यमार्गांवर असलेल्या अतिक्रमणामुळे  दिसेनासे झालेले आहे, यामुळे शासनाच्या योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचु शकत नाही, शासनाची योजना असतानाही अनेकांना माहिती अभावी सदर योजनेचा लाभ घेता येत नाही, यामुळे प्रशासनाने प्रसिध्दी फलकाची उंची वाढवावे अशी मागणी केली जात आहे.