विद्यार्थ्यांनी पुस्तकावर प्रेम करून उन्नतीचा मार्ग गाठावा : प्राचार्य डाँ. संजय सिंग यांचे प्रतिपादन

विसापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप

विसापूर (प्रतिनिधी) : जीवनात प्रेम विविध प्रकारे केले जाते. प्रेमात जात, धर्म, भाषा, प्रांत याची सीमा नाही. अनेक नात्यात ते व्यापले आहे. मात्र विद्यार्थी दशेतील प्रेमाला अनन्यासाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकावर प्रेम करून उन्नतीचा मार्ग शोधावा. त्यातून उच्च शिखर गाठावे, असे प्रतिपादन गडचांदूर येथील शरद पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. संजय सिंग यांनी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी केले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापूर मध्ये अमृतमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून ” कोरोना काळ आणि युवाशक्ती ” या विषयावर रासेयोचे सात दिवसाचे शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या समारोप प्रसंगी डाँ. संजय सिंग प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.पी. एम. काटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डाँ. संजय सिंग, गडचांदूर, प्राचार्य डाँ. दिलीप जयस्वाल, विसापूर, डाँ. विजया गेडाम, चंद्रपूर, उपप्राचार्य स्वप्नील सिद्धमशेट्टीवार, डाँ. पुष्पा कांबळे, रासेयो समन्व्यक डाँ. उषा खंडाळे, विसापूर सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, कार्यक्रम अधिकारी डाँ. कुलदीप गोंड, डाँ. राजकुमार बिरादार, डाँ. विना खनके, डाँ. पुरुषोत्तम माहोरे यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डाँ. पी. एम. काटकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर विद्यार्थ्यांना नवनवे प्रयोग करण्याचे शिक्षण देते. स्वयंशिस्त शिकवते. आपुलकीची भावना वाढवते. संघटनात्मक बांधिनीवर व श्रम कौशल्य विकसित करते. आपले कर्तृत्व उजागर करते. ही संधी विद्यार्थ्यांनी आत्मसात करून भविष्याची वाटचाल करावी, असे प्राचार्य डाँ. काटकर यांनी आवर्जून सांगितले. विसापूर चे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, डाँ. स्वप्नील सिद्धमशेट्टीवार, डाँ. विजया कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी अजय मोहुर्ले, विद्यार्थीनी प्रतिनिधी आकांक्षा सहारे यांनी मनोगतातून अनुभव विश्व सांगितले.

शिबिराचे अहवाल वाचन डाँ. कुलदीप गोंड यांनी केले. संचालन कार्यक्रम अधिकारी डाँ. राजकुमार बिरादार यांनी केले, तर आभार डाँ. पुरुषोत्तम माहोरे यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप काकडे, सुनील रोंगे, विद्या देवाळकर, प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, शशिकला जिवने, रिना कांबळे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.