भारतीय सुदर्शन समाज महासंघाने केले राजेश रेवते यांचा सत्कार

अतुल कोल्हे भद्रावती :- सुदर्शन सार्वजनिक शिक्षण संस्थेचे संचालक आणि सुदर्शन समाज महासंघ के महाराष्ट्र राज्यचे संघटन मंत्री राजेश रेवते त्यांची नुकतीच विदर्भ राज्य नॅशनल जर्नालिस्ट फेडरेशन ( भारतीय पत्रकार महासंघ ) नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, सुदर्शन समाजाच्या वतीने राष्ट्रीय सचिव श्री राजूजी दशरथ राठोड यांच्या हस्ते शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ व पेन देऊन सत्कार करण्यात आला.

लिटल फ्लॉवर इंग्लिश कॉन्व्हेंट माजरी येथे हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी भारतीय सुदर्शन समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य महामंत्री मनोजबाबू खोटे, युवा महामंत्री रोशन राठोड, युवा जिल्हाध्यक्ष राकेश खोटे, जिल्हा कोषाध्यक्ष गिरीश शुक्ला, जिल्हा कार्याध्यक्ष दुर्गेश नन्हेटे, शहराध्यक्ष शैलेश महातव, सफाई कर्मचारी समन्वय समितीचे सदस्य गोकुल तांबे, कमलेश राठोड, उमेश नन्हेंट , विक्रम उसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. राजेश रेवते या सत्कारप्रसंगी म्हणाले की, भारतीय पत्रकार महासंघाचे विदर्भातील प्रत्येक शहर व ग्रामीण भागात ही संघटना वाढवायची आहे.

पत्रकार आपल्या लेखणीने प्रशासन आणि सरकारला जागे करीत असते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करील, असे मत त्यांनी व्यक्त केले.