विहीरीत उडी घेवुन शेतकऱ्याने केली आत्महत्या

मूल पोलीसानी केला मर्ग दाखल

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यताील कांतापेठ येथील एका शेतकऱ्याने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी 2 वाजता उघडकीस आली, रामदास बापूजी गावतुरे वय 60 वर्षे रा. कांतापेठ असे मृत्तक शेतकऱ्यांचे नांव आहे.

मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील शेतकरी रामदास बापुजी गावतुरे यांच्याकडे चिरोली शेतशिवरात 22 आर शेती आहे, आज दुपारी ते शेतावर गेले असता त्यांच्या शेताच्या बाजुला भिमराव कुंभारे यांची शेती असुन त्याच शेतामध्ये मोठी विहीर आहे. रामदास गावतुरे हा सदर शेतातील विहीरीमध्ये उडी घेवुन आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारण बातमी लिहीतपर्यंत कळले नाही. मृत्तकाच्या पश्चात पत्नी आणि विवाहीत मुलगा, मुलगी आहे.

घटनास्थळाला मूल पोलीसांनी भेट देवुन पंचनामा केले व मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.