बंधाऱ्याच्या कामासाठी केलेल्या खोदकामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता

अनेक दिवसांपासुन कामबंद

मूल (प्रतिनिधी): शेताला सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी तालुका कृषी विभागाने आगडी शेतशिवारात बंधारा बांधकामासाठी कंत्राटदाराला लेआऊट दिले, कंत्राटदारांनी जवळपास 15 फुट खोल खोदकाम करून ठेवलेले असुन सदर खोदकाम केलेल्या खडयात पाणी जमा होवुन आहे, यामुळे या खड्यात पडून जिवीतहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी मूल तालुक्यातील मौजा आगडी येथे तालुका कृषी विभागाकडून बंधाऱ्याच्या कामाला सुरूवात केलेली होती, सदर कामाचे अंदाजपत्रक जवळपास 12 लाखाचे बनविण्यात आले असुन जिल्हा नियोजनातुन काम पुर्ण करण्यात येणार आहे आगडी येथील कामाला सुरूवात करीत असतानाच कामाचा दर्जा अतिशय निकृष्ठ साहित्य वापरून व पाण्यात रवाडी टाकुन करण्यात येत होते, यामुळे कामाचा दर्जा खालावण्याची शक्यता असल्याने तालुका कृषी विभागाने काम बंद करून दर्जेदार काम करण्यासाठी कंत्राटदाराला भाग पाडले, मात्र त्यानंतर कंत्राटदारानी जवळपास 15 दिवसापासुन काम बंद केल्याने बंधाऱ्याचे काम सुरू केेलेल्या खडयात मोठया प्रमाणावर पाणी जमा होवुन आहे.

सदर बंधाऱ्याचे काम सुरू केलेल्या ठिकाणी मोठे मोठे वृक्ष असल्याने याठिकाणी जंगलाचे स्वरूप आहे, यापरिसरात वन्यप्राण्याची रेलचेल असते, त्यासोबतच आगडी आणि जानाळा येथील गुरे ढोरे चराईसाठी त्याच परिसरात नेल्या जाते, यामुळे खड्डा तयार केलेल्या ठिकाणी मानव वन्यप्राणी, गुरेढोरे पडुन जिवीतहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे तालुका कृषी विभागाने बंधाऱ्याचे काम तात्काळ पुर्ण करावे अशी मागणी नागरीक करीत आहे.

कंत्राटदारास काम सुरु करायला सांगितले : प्रभारी तालुका कृषी अधिकारी गायकवाड                                कृषी विभागाच्या वतीने आगडी येथील बांधाऱ्याचे काम सुरु होते, परंतु कंत्राटदारांनी काही दिवसापासून काम बंद ठेवलेले आहे, यामुळे कंत्राटदाराला काम सुरु करायला सांगितले आहे अशी प्रतिक्रिया तालुका कृषी विभागाचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड यांनी दिली.