जिवती पोलीस स्टेशन येथे भव्य आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबीर संपन्न

बळीराम काळे जिवती:चंद्रपुर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे संकल्पणेतुन व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील नागरीकांच्या रोगाचे निदान होवुन त्यांना वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रियांचे व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी या हेतुने मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबीराचे आयोजन तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन जिवती च्या आवारात आयोजन करण्यात आले होते.

रोगनिदान शिबीराचा तालुक्यातील ६५६ ग्रामस्थानी लाभ घेतला. यावेळी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करुन लागलीच त्यांना आवश्यक औषधी पुरवठा मोफत करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य विषयक मार्गदर्शनही करण्यात आले.

यावेळी ठाणेदार सचिन जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ गजेंद्र अहीरकर, डॉ प्रविन येरमे, डॉ. मिनल ठाकरे, डॉ आशिष गुज्जनवार, डॉ जोयशी, वॉर्ड बॉय विशाल पवार, अधिपरीचारीका बिंदु शामकुळे, पोलीस स्टेशन जिवती येथील पोलीस अंमलादर शरद राठोड, रमाकांत केंद्रे, अमोल कामले यांनी सहभाग नोंदविला.