राजोलीत अवैध दारूविक्रीमुळैे नागरीक हैरान

‘‘मल्लेश’’ ची दारू राजोलीत चर्चेत

मूल (प्रतिनिधी) : जिल्हयातील आडवी बाटल आता उभी झाली मात्र अवैध दारूविक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, मूल तालुक्यातील राजोली येथील ‘‘मल्लेश’’ नामक इसम अवैध दारूविक्रीचा बादशहा झाला असुन त्याच्यामुळे नागरीक हैरान झाले आहे मात्र पोलीस प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरीक रोष व्यक्त करीत आहे.

चंद्रपूर जिल्हयात गेली 5 वर्षे दारूबंदी होती, त्यावेळेसही मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्रीचा महापुर वाहत होता, यामुळे महाविकास आघाडी सरकारने जिल्हयात दारू सुरू केली, मात्र अवैध दारूविक्रीवर अजुनही अंकुश लागलेला नाही, मूल तालुक्यातील मौजा राजोली येथील ‘‘मल्लेश’’ नामक इसम राजरोषपणे अवैध दारूविक्री करीत असतानाही पोलीस पाटील, पोलीस अमलदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. अवैध दारूविक्रीमुळे अनेकदा नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, परंतु मल्लेशची अवैध दारूविक्री बंद होत नसल्याने नागरीकांनी रोष व्यक्त केला आहे.

दारूबंदीच्या काळात राजोली येथे मोठया प्रमाणावर देशी विदेशी दारूसह मोहफुलाची दारू काढुन विक्री केली जात होती, मात्र सध्यास्थितीत मोहफुलाची दारूविक्री मंद झालेली असुन देशी, विदेशी दारूविक्रीचा महापुर राजोलीत वाहात आहे. सदर दारूविक्रीमुळे गावातील शांतताभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे राजोलीत अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यात यावे अशी मागणी नागरीक करीत आहे.