लग्नाच्या बोलणीसाठी निघालेल्या परिवारातील 5 जण ठार

अपघातात 5 जण जखमी

अमरावती (प्रतिनिधी) : लग्नाची बोलणी करण्यासाठी निघालेल्या तवेरा चारचाकी वाहणाला ट्रकनें जोरदार धडक दिल्याने 5 जण ठार तर 5 जण जखमी झाल्याची घटना शहरातील रहाटगाव रिंगरोडवर घडली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अंजनगाव बारी येथील पोकळे परिवार हे तवेरातून वलगाव येथे मुलाच्या लग्नाच्या बाेलणीसाठी जात हाेते. या अपघातात तवेरा वाहनाचा चालक रमेश आखरे, रोशन आखरे व पोकळे परिवारातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामधील ट्रक अमरावतीहून नागपूरकडे जात होता तर तवेरा (एमएच २६ एए ७९९९) अमरावतीहून वलगावकडे निघाली होती. ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नांत हा भीषण अपघात झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान ठार झालेल्यांपैकी काही जण अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत.

या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.