आर्थिक मोबदला द्या अन्यथा गावाचे पुनर्वसन करा

मागणी मान्य न केल्यास कंपनीला लावणार ताला

चेकबरांज (पिपरबोडी ) वासीयांची पत्रपरिषदेत मागणी

अतुल कोल्हे भद्रावती: – अकृषक प्लॉट आणि त्यावरील मकानाचा आर्थिक मोबदला येथील रहिवाशांना न देता परस्पर मूळ शेत मालकाला देण्याचा प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून कर्नाटक एम्टा कंपनीने केला फेरफार करून सातबारा नावे कमी करून कर्नाटक एम्टा च्या नावे चढविण्यात आले. ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देवून न्यायाची मागणी केली परंतु यश आले नाही आता चेकबरांज (पिपरबोडी ) वासीयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पंधरा दिवसात न्याय न मिळाल्यास कंपनीला ताला ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

चेक बरांज अंतर्गत येणाऱ्या नवीन (पिपर बोडी ) आणि जूनि पिपर बोडी रहिवाशी वसाहतीचा भाग सर्वे नंबर 85 /2 , 86 / 2 ब , 88 /2 यात वसलेली आहे. सन 1985-86 मध्ये या सर्वे नंबर ची शेतजमीन तहसीलदार यांच्या आदेशाने अकृषक करण्यात आली अनेकांनी येथील प्लॉट खरेदी करून मकान बांधली ते गेल्या 30 ते 35 वर्षापासून राहत आहे त्यांच्या नावाने चेक बरांज ग्रामपंचायत रेकॉर्ड तयार झाला आहे कर्नाटक एम्टा कोळसा खाणी करिता 2009 मध्ये ही जमीन संपादित करण्याचा प्रकार झाला त्यानुसार 395. 25 हेक्टर आर क्षेत्र संपादित करून या भागाची संयुक्त मोजणी करण्यात आली तेव्हा प्लाट धारकांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही. या शेत जमिनीचे मूळ मालकाच्या नावे दर्शवून प्लाट धारकांची नावे वगळण्यात आली. या प्लॉट धारकांच्या नावे सातबारा असून त्यांचे ग्रामपंचायत रेकॉर्ड वर नाव असून कंपनीने जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून मुळशेत मालकाला मोबदला दिला व कंपनीचे नावे सातबारा नोंद केली हा प्रकार बाबत कित्येकदा जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. या प्रकारामुळे प्लॉट धारकांच्या घरावर मालकी हक्क असूनही शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ घेता येत नाही याकरिता त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी कर्नाटक एम्टा कंपनीने आम्हाला आर्थिक मोबदला द्यावा नाहीतर गावाचे पुनर्वसन करा अशी मागणी केली आहे या प्रकाराबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी, पालक मंत्री , खासदार, आमदार आदींना निवेदन दिले कंपनीने मागणी मान्य न केल्यास कंपनीला ताला ठोक नार असल्याचे पत्र परिषदेत सांगण्यात आले. यावेळी शकर य्या कॉलनिडी, सरपंच प्रभा गडापी, समया बोनागिरी, लालचंद्र वर्मा, जयकुमार सिक्का, कुममर्या विजया, कुमार रंगास्वामी, आनंद सिक्का , अरुण सुकका, आधीसह शेकडो गावकरी उपस्थित होते.